गेल्याच आठवड्यात झालेल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या हत्येने इस्लामपूर शहर हादरून गेले होते. या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ.कुलकर्णी यांची परिचारिका सीमा यादव आणि तिचा प्रियकर निलेश दिवाणजी या दोघांना अटक केली आहे.
सीमा यादव डॉ. कुलकर्णींच्या क्लिनकमध्ये नोकरीला होती. तिची मागच्या तीन-चार दिवसांपासून कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी तिला आणि तिचा मित्र निलेश दिवाणजी या दोघांना अटक केली.  या हत्येमध्ये आणखी एक तिस-या व्यक्तीचाही सहभाग आहे. इस्लामपूरमध्ये २० डिसेंबरला डॉ. प्रकाश कुलकर्णी (६५) आणि त्यांच्या पत्नी (५८) वर्षीय डॉ. अरुणा कुलकर्णी यांची राहत्या घरी चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. डॉ. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुममध्ये, तर त्यांच्या पत्नीचा म्हणजे डॉ. अरुणा कुलकर्णींचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला होता.