सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात बाल लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे पोलिसांनी दाखल करून घेतले असून, यापैकी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. उंदरगाव (ता.माढा) व खुडूस (ता. माळशिरस) येथे या घटना घडल्या.
वेळापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हय़ाची माहिती अशी, की खुडूस येथे शिवतेज नगरात राहणारी १५ वर्षांची शालेय मुलगी वेळापूर येथे शाळेत वार्षिक परीक्षेचे पेपर देऊन घराकडे परत येत असताना वाटेत यशोधन दादासाहेब कांबळे या तरुणाने सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून पंढरपूर येथे पळवून नेले. तेथून रेल्वेतून पुण्यात नेऊन त्याने भाडय़ाची खोली घेऊन सदर मुलीला काही दिवस ठेवले व तिच्यावर बलात्कार केला. यशोधन कांबळे विवाहित असताना त्याने हे दुष्कृत्य केल्याचे दिसून आले. यशोधन कांबळे यास अटक करण्यात आली आहे.
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे राहणाऱ्या एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बापू गायकवाड (रा. पुळूज, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत ऊसतोडीच्या कामासाठी उंदरगाव (ता.माढा) येथे पांडू चव्हाण यांच्या शेतात आली होती. परंतु बापू गायकवाड याने सदर मुलीला हेरून फूस लावली व पळवून नेले.
पाण्यात बुडून मृत्यू
बार्शी येथे सुभाषनगरजवळ तलावात पाण्यात बुडून तृप्ती तेजस सुरवसे (२५, रा. सुभाषनगर, बार्शी) ही तरुणी मृत्युमुखी पडली. तृप्ती ही घरातून दुपारी बाहेर पडली. नंतर ती घराकडे परतली नाही. शोध घेतला असता तलावात तिचा मृतदेह आढळून आला. बार्शी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे, तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सुनील तुळशीदास भोसले (२५, रा. पंढरपूर) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती नोंद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2014 रोजी प्रकाशित
बाल लैंगिक शोषणाच्या सोलापूर जिल्हय़ात दोन घटना
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात बाल लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे पोलिसांनी दाखल करून घेतले असून, यापैकी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. उंदरगाव (ता.माढा) व खुडूस (ता. माळशिरस) येथे या घटना घडल्या.
First published on: 02-04-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two cases of child sexual exploitation in solapur district