अलिबाग – अलिबाग तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. रघुनाथ हिराजी म्हात्रे (५६) आणि ॠषिकेश रघुनाथ म्हात्रे अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा – “देशातील लहान लेकरालाही…”, अजित पवार गटाच्या नेत्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अलिबाग तालुक्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अशातच वडील रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषिकेश हे दोघे काल रात्री शेतात गेले होते. यावेळी त्यांच्यावर वीज पडली. ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, तहसीलदार विक्रम पाटील यांनी रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषिकेश म्हात्रे यांच्या घरी भेट देऊन त्यांची पत्नी व मुलगा यांचे सांत्वन केले.