रत्नागिरी जिल्ह्य़ात आणखी दोन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू ओढवल्यामुळे जिल्ह्य़ातील करोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या १३ झाली आहे.
यापैकी एक रुग्ण अंबोळगड (ता. राजापूर) येथील असून दुसरा मांडिवली (ता. दापोली) येथील आहे. याचबरोबर, जिल्ह्य़ात आणखी ९ नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८ रत्नागिरी तालुक्यातील, तर १ गुहागर तालुक्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाबाधितांची एकूण संख्या ३४३ झाली आहे. त्यापैकी १२९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २०१ आहे. शुक्रवारी गुहागर येथील चार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. अजून ३०१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्ह्य़ात गृह विलगीकरणाखाली असलेल्या व्यक्तींची संख्या घटली आहे. १२ हजार १२० जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ६५ हजार ६१२ जण गृह विलगीकरणाखाली आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्य़ातून रत्नागिरी आलेल्यांची संख्या ४ जूनपर्यंत १ लाख १८ हजार १३९ एवढी आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्य़ातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्य़ात गेलेल्यांची संख्या ४६ हजार ५०५ आहे. संस्थात्मक विलगीकरण एकूण ६८ संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. तसेच जिल्ह्य़ामध्ये आतापर्यंत विविध रुग्णालयात १ हजार २३ संशयित रुग्णांना दाखल केले होते. त्यापैकी ९५५ संशयित रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
जिल्ह्य़ातील होम क्वारंटाईनची संख्या घटली आहे. मुंबईसह बाधीत तसेच इतर जिल्ह्य़ातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. यातील १२ हजार १२० जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आज रोजी होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या ६५ हजार ६१२ इतकी आहे.
जिल्ह्य़ात सध्या ११६ ठिकाणी कन्टेन्मेंट झोन आहेत. रत्नागिरी तालुक्यात १५ गावे, गुहागर तालुक्यामध्ये ८ गावे, खेड तालुक्यात १६ ,संगमेश्वर तालुक्यात २३, मंडणगड तालुक्यामध्ये २, दापोलीमध्ये १६, लांजा तालुक्यात ८, चिपळूण १७ आणि राजापूर तालुक्यात ११ गावांचा समावेश आहे.