अकोला – अकोल्यातील काही युवक तिरुपती बालाजीला दर्शनाला जात असताना नवजीवन एक्स्प्रेसमधून खाली पडून दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्धा ते वर्धा ते हिंगणघाट दरम्यान आष्ट्याजवळ बुधवारी रात्री सदर घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही युवक रेल्वेच्या दरवाज्यात बसून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक ते दोघे ट्रेनमधून खाली पडले. सागर बगाडे (28) व सारंग नाटेकर (21) अशी या दोन तरूणांची नावे आहेत. दरम्यान, दोघे ट्रेनमधून पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या मित्रांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केली.

शोधकार्यादरम्यान दोन्ही तरूण आष्टा गावाजवळ ट्रॅकवर पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामध्ये दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन सेवाग्राम शासकीय पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहेत. सेवाग्राम पोलीस स्थानकात रेल्वे डब्यातून पडून आकस्मिक मृत्यू झाल्याची नोद करण्यात आली असल्याची माहिती सेवाग्राम पोलीस स्थानकाचे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस.जी.बोथे यांनी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपार करित आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people felt from train akola wardha jud
First published on: 18-07-2019 at 15:11 IST