लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेत येथील नूरनगर परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीची दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांना पकडण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.
सुभान अहमद निसार अहमद व मोहंमद इसरार मोहंमद इस्माईल अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून ते दोघेही येथील रहिवासी आहेत. विक्री करण्याच्या हेतूने दोघा इसमांकडे गावठी पिस्तूल असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता दोघांना मुद्देमालासह पकडण्यात यश आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. गेल्या सोमवारी आझादनगर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इब्राहिम अहमद अब्दुल गणी ऊर्फ र्दुी याला पकडले होते. त्यानंतर अशा स्वरूपाची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two selling gun arrested
First published on: 06-04-2014 at 07:06 IST