धुळे येथील चाळीसगाव रोडवरील कामगारनगर पोलिसांनी एका ४०७ मॅटेडोअर वाहनातून संशयास्पदरित्या मोटरसायकली वाहून नेताना दोन जणांना रंगेहाथ पकडले. या दोघांकडून ६ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यामध्ये आणखी दोघे सामील असून चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यातील पथकाने या गाडीत विनापरवाना मोटरसायकली वाहून नेताना शाहरुख शेख (वय २५, रा. जुने नाशिक) या चालकाला आणि रमजान पठाण (वय ३५, रा. नानपारा, बैराहिज, उत्तर प्रदेश) या दोघांना रंगेहाथ पकडले. हे दोघे या मोटरसायकली मुंबईतील बांद्रा येथे अल्ताफ (रा. धुळे) आणि वाहिद कुरेशी (रा.बांद्रा) यांच्याकडे घेवून जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत ४ लाखाच्या मॅटेडोअरसह मोटरसायकली असा एकूण ६ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी रऊफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two suspect of two wheeler theft arrested in dhule
First published on: 19-02-2017 at 11:40 IST