शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात केलेल्या हल्ल्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशा शाब्दिक संघर्ष सुरु झालाय. सामंत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतानाच हा हल्ला म्हणजे उस्फुर्त प्रतिक्रिया होती असं मत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. याच वक्तव्यावरुन शिंदे गटाला समर्थन करणाऱ्या रामदास कदम यांनी खोचक शब्दांमध्ये सुभाष देसाईंना टोला लगावलाय.

नक्की वाचा >> “…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा

मंगळवारी सामंत यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत त्यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात बोलताना रामदास कदम यांनी शिवसेनेवर टीका केलीय.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

“काही लोकांच्या हातात काहीच नाही तेवढेच काम त्यांच्या हातात आहे. मला वाटतं उदय सामंत असो, एकनाथ शिंदे असो किंवा इतर आमदार असो, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, मागासलेपण या गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्यात. आपण आपल्या कामाला लागावे,” असं रामदास कदम म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

“शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवणच आहे. अंगावर आले तर शिंगावर घ्या, तो भाग वेगळा आहे. आमच्यासाठी हे काही नवीन नाही. अशापद्धतीने भ्याडपणे हल्ला करणे योग्य नाही. हाताला दगड बांधायचे, काचा फोडायच्या हे काही मर्दुमकीचं लक्षण नाही,” असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

नक्की वाचा >> Photos: आपल्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणतात, “मी शिवसेनेत प्रवेश…”

यावेळी पत्रकारांनी, “शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्लीमध्ये असं विधान केलं आहे की, या हल्ल्याचा मी निषेधच करतो पण ही उस्फुर्त प्रतिक्रिया आहे,” असं म्हणत प्रश्न विचारला असताना रामदास कदम यांनी देसाईंना लक्ष्य केलंय. “सुभाष देसाई म्हणजे फार झंझावात आणि वाघासारखे नेते. त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिली आहे. पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडलं याचं मला आश्चर्य वाटतंय. प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झालाय आणि बोलतोय याचं मला आश्चर्य वाटतंय,” असं रामदास कदम म्हणालेत.