माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात झाला. या हल्य्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर शिंदे गटातचे प्रवक्ते दीपक केसरकर तसेच आमदार शंभुराज देसाई यांनी या घटनेनंतर निषेध व्यक्त केला आहे. तर दुरीकडे उदय सामंत यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत म्हणून मी सुखरुप वाचलो. हा प्रकार निंदनीय आहे, असे उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा >> मोठी बातमी! पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

“पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजमधून तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. माझ्यापुढे आदित्य ठाकरे यांचा ताफा नव्हता. मी खोटं काहीही सांगणार नाही. जे सांगेन ते पोलिसांना सांगेन. आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेला होता. त्यानंतर सिग्नल लागले. मी कोणाचाही ताफा फॉलो करत नव्हतो. सिग्नल लागल्यामुळे मी नियमप्रमाणे थांबलो होतो. यावेळी माझ्या बाजूला दोन गाड्या आल्या. त्यांच्या हातात जे होते, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. बाजूला ५० ते ६० शिवसैनिक होते. मात्र शिवसैनिकांनी काहीही केलेले नसून फक्त १२ ते १५ लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला,” असे उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा >> उदय सामतांच्या गाडीवर हल्ला, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; शंभुराज देसाई म्हणाले…

“जो प्रकार घडला त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली. त्यांच्या हातात दगड कसे आले. त्यांना माझ्या गाडीचा नंबर कसा समजला, याचा तपास केला पाहिजे. ते मला शिव्या घालत होते. या घटनेतून मी वाचलो हे परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत. परंतु झालेला प्रकार निंदनीय आहे,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा >> “उपमुख्यमंत्र्यांना खातंच दिलेलं नाही, प्रत्येक फाईल…”, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

उदय सामंत यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात असतान उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला. या हल्ल्यात सामंत तसेच त्यांच्या चालकांना कोणतीही इजा झाली नाही.