वाई: शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित शोभयात्रे उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः  दुचाकी चालविली.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली ही शोभायात्रा पाण्यासाठी राजपथावर दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त  साताऱ्यात श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानीचा मान मिळवणाऱ्या सातारा शहरात मंगळवारी सायंकाळी साडेतीनशे दुचाकींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये खासदार उदयनराजे  भोसले यांनी स्वतः  दुचाकी (बुलेट)  चालवत  रॅलीत सहभाग घेतला.

हेही वाचा >>> रायगड : ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी सज्ज; प्रशासकीय तयारी पूर्ण

रॅलीत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हि रॅली पाहण्यासाठी राजपथावर दुतर्फा सतारकरांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेत अग्रभागी असलेली शिवरायांची प्रतिमा भगवे वेषधारी मावळे आणि  शिवरायांच्या जयघोषाने शिवकाळ अवतरल्याची प्रचिती आली . शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साडेतीनशे व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त २७ मे ते दोन जून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मशाल महोत्सव, वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरात ३५० दिवसांची भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.

हेही वाचा >>> “राजदंडातील राजधर्माचे पालन होत नाही, नव्या राजेशाहीमुळे…”, ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोभायात्रा सुरु होण्यापूर्वी पोवई नाका वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांकडून अभिवादन केले यानंतर शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा पोवईनाका शाहू चौक ते राजवाडा अशी काढण्यात आली यात्रेत सहभागी भगवे ध्वजधारी मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खासदार उदयनराजे भोसले शोभायात्रेत केवळ सहभागी झाले नाहीत तर त्यांनी स्वतः दुचाकी चालवत सातारकरांना सुखद धक्का दिला. उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली .ही शोभायात्रा पाण्यासाठी राजपथावर दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .या शोभायात्रेत माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे मनोज शेंडे सागर पावशे सागर भोसले विवेक निकम जीवनधर चव्हाण ओंकार कदम आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले. त्यामुळे शोभायात्रा मार्गावर कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही.