आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपदी ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले. ज्यांना सर्वकाही दिले, तेही गेले. आपण काय बोललो नाही. मात्र, आता अति होत असून, शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच, या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे.

हेही वाचा – तीन चिन्ह, तीन नावं.. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव; म्हणाले, “लवकरात लवकर…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हिंदू म्हणायची कुणाला हिंमत नव्हती…”

“ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, तिचा घात करायला निघालात. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं. या देशात हिंदू म्हणायची कुणाला हिंमत नव्हती, तेव्हा बाळासाहेबांनी ती दिली. ती हिंमत तुम्ही गोठवली,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.