सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने शिंदे गटाला मोठे धक्के दिले आहेत. तसेच राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. दुसरीकडे, १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यपाल यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देशात राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवायची की नाही, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

sambit patras
“भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त”; संबित पात्रांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!
Supreme Court Newsclick founder Prabir Purkayastha arrest illegal explained
सर्वोच्च न्यायालयाने न्यूजक्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर का ठरवली?
Supreme Court, reforms,
यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हणाले, “निवडणूक प्रचार करणं हा…”
unnatural sex is not rape
पतीने पत्नीशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करणं बलात्कार नाही, संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय
Supreme Court
“सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
Governor, MLA, Court,
उद्या कोणी याचिका करून पद्म पुरस्काराची मागणी करेल, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांना खडेबोल
Union Home Minister Amit Shah on Saturday asserted that only Prime Minister Narendra Modi government has the courage to stop infiltrators in the country
आरक्षण रद्द करण्याच्या कथित व्हिडिओवर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर आरोप करत म्हणाले…

हेही वाचा- शिंदे सरकार थोडक्यात वाचलं! आता ठाकरे गट काय करणार? अनिल परब म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे की, मी वारंवार म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल, तर तो आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही? याबद्दलचा असेल. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यामध्ये त्यांनी एकूणच सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची पूर्णपणे चिरफाड केली आहे.”

हेही वाचा- “…तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती, असं म्हणायलाही आता अर्थ उरला नाही. आता राज्यपालांची भूमिका सरळसरळ अयोग्य होती, असं म्हटलं तरी चालेल. राज्यपालांच्या भूमिकेचं न्यायालयाने वस्त्रहरण केलं आहे. आतापर्यंत राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त यंत्रणा होती. पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडवडे ज्याप्रकारे शासनकर्ते काढत आहेत, हे बघितलं तर येथून पुढे राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवायची की नाही, हा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.