सांगली : महापालिका क्षेत्रात विनापरवाना डिजिटल छपाई व्यवसाय करणार्‍या आस्थापनावर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी छापा टाकून १८ हजार रूपयांचा दंड ठोठावत साहित्य जप्त केले. तर विनापरवाना डिजिटल वाहनाद्वारे जाहिरात करणारे वाहनही जप्त केले.

 सांगली मिरज रोडवरील विनापरवाना तळघरांमध्ये फ्लेक्स छापायचा  व्यवसाय करण्यात येत आहे. आयुक्त श्री. गुप्ता आणि सहायक आयुक्त यांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. व्यवसाय  सुरू करण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर १८ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. तसेच दंड न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त सचिन सागावकर यांनी सांगितले. महापालिके क्षेत्रातील बेकायदेशीर फ्लेयस, फलक बोर्ड ,छपाई करणार्‍या आस्थापना रडारावर असून त्यावर  यापुढे कारवाई करण्यात येणार आहे . फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच कर्मवीर भाऊराव चौकात लावण्यात आलेली  विना परवाना एलईडी स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आल्या वरून वाहन जप्त करण्यात आले आहे.