रायगड जिल्ह्यातील वाहतूक प्रश्नांसदर्भात रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या सर्व संबंधित विभागांची बठक घेतली होती. या बठकीत रस्त्यावर अनधिकृत गतिरोधक टाकणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बांधकाम विभागाने अनधिकृत गतिरोधक हटविण्याचे काम सुरू केलेले नाही, तसेच अनधिकृत गतिरोधक टाकणाऱ्याविरोधात गुन्हेदेखील दाखल केले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात महामार्ग, राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर एकूण ४२ ठिकाणे अपघातप्रवण म्हणून नोंदविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आढावा रस्ता सुरक्षा समितीच्या बठकीत सादर करण्यात आला. त्यानुसार,सन २०१७मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ७५४ अपघात झाले होते. त्यात १८१व्यक्ती मृत झाल्या असून ६९८व्यक्ती जखमी झाल्या. याच कालावधीत सन २०१८मध्ये ७९८अपघात झाले, त्यात २३३ व्यक्ती मृत झाले तर ८६५ व्यक्ती जखमी झाले आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, सुरक्षात्मक उपाययोजनांचा अवलंब न करणे, लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, मद्यपान करून वाहन चालवणे ही या अपघातामागील प्रमुख कारणे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized speedbreaker in maharashtra
First published on: 21-01-2019 at 00:43 IST