चंद्रपूर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २०० हेक्टरमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर तातडीने सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सर्वाधिक नुकसान राजुरा आणि पोंभुर्णा तालुक्यात झाले.

हेही वाचा >>> अकोला: महादेव-पार्वतींच्या लग्न सोहळ्याचा उत्साह; आदिवासी कोळी महादेव समाजाची शेकडो वर्षांची परंपरा

मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तीन ते चारदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसाने खरीप हंगामावर पाणी फेरले गेले. त्यामुळे रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त होती. जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी यासह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. रब्बी हंगामात वातावरण चांगले असल्याने पीक उत्तम होते. अनेक भागांत पिके काढणी सुरू आहे. काही ठिकाणी पिके काढून ती शेतात ठेवण्यात आली आहे. यंदा पीक चांगले आल्याने शेतकरीही समाधानी होते. पीक काढणीनंतर हाती आलेल्या पैशातून कर्जाची परतफेड करू अशी आशा शेतकऱ्यांना होती.

हेही वाचा >>> वर्धा: देशातील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतात, “सर्वांसाठी उच्च शिक्षणाची पूर्तता व्हावी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवामान खात्याने १७, १८ मार्च रोजी ऑरेंज, तर १९ ते २१ मार्चदरम्यान येलो अलर्ट जारी केला. याच दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला. राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यांत गारपीट झाली. रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा बसला. कापूस, तूर, हरभरा, गहू,ज्वारी पीक जागेवरच मातीमोल झाले. राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या. त्यामुळे कापणी करून ठेवलेले पीक भुईसपाट झाले. पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवला. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू केले. राजुरा, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने जवळपास दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. अन्य तालुक्यांत नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.