राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. हे ऐतिहासिक चिन्हाचं अनावरण शरद पवार गटाने किल्ले रायगडावर जाऊन केलं. किल्ले रायगडावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन निर्माण झाले. या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेलं. निवडणूक आयोगाने साक्षी पुराव्यांच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्षाचा दर्जा दिला. परिणामी पक्षनाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेले. त्यामुळे शरद पवार गटाला नवे नाव आणि नव्या चिन्हासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आला होता. त्यानुसार, शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्हाचे पर्याय सुचवले होते. परंतु, त्यापैकी एकही चिन्ह दिलं नाही. पण तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले.

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
Vasudev, Vasai, voting,
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

तुतारी हे राज्याचे ऐतिहासिक वाद्य आहे. त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळाले असल्याचा दावा सातत्याने केला जातोय. यानिमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आले. वयोमानानुसार, शरद पवारांना रायगड किल्ला सर करणे अवघड होते. परंतु, रोपवे आणि पालखीमुळे त्यांना रायगड किल्ल्यावरचा प्रवास सुकर झाला. आधी ते रोप वेने रायगडावर पोहोचले. तर नंतर त्यांनी पालखीचा आधार घेतला. जवळपास ४० वर्षांनंतर ते किल्ले रायगडावर आज आले आहेत.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?

शरद पवारांच्या हस्ते चिन्हाचे अनावरण झाल्यानंतर शरद पवारांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. “सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. याठिाकणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया.”

कार्यकर्त्यांची गर्दी

दरम्यान, रायगडावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी जमली आहे. प्रत्येकाला फोटोसेशन करायचं आहे. परंतु, हे फोटोसेशन शिस्तीत करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केल्या आहेत.