राज्यात खळबळ उडवणाऱ्या अहमदनगरच्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणात उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँडव्होकेट उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने बाजू लढविण्यासाठी नगर जिल्हा पोलिस प्रशासनाने ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यासंबंधीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविला होता.त्यास अनुसरून,विधी व न्याय विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार यादव यांची या खटल्यात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Update kopardi rape and murder case adv umeshachandra yadav
First published on: 16-01-2019 at 15:10 IST