केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यंदाही निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीवरून दिसते. हरिता व्ही. कुमार ही विद्यार्थिनी देशात पहिली आली आहे. एकूण ९९८ यशस्वी विद्यार्थ्यांची यादी आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
ऑक्टोबर २०१२ मध्ये घेतलेल्या मुख्य लेखी परीक्षा आणि मार्च-एप्रिल २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारे यशस्वी विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीमध्ये लातूरचा कौस्तुभ दिवेगावकर देशात पंधराव्या स्थानावर आहे. लातूरचीच क्षिप्रा आग्रे देशात २९ व्या स्थानावर आहे. मृण्मयी जोशी ९८ व्या स्थानावर, अभिजीत राऊत ११३ व्या स्थानावर, योगेश निरगुडे १३० व्या स्थानावर आहे.