सांगली : महापालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या सावली बेघर केंद्रातील ५७ निराधारांचे बुधवारी लसीकरण करण्यात आले. तसेच या वेळी या ठिकाणी कार्यरत असलेल्या ९ सेवकांचेही लसीकरण करण्यात आले. करोनाच्या पहिल्या  लाटेमध्ये येथील ४३ जणांना एकाच वेळी करोनाची बाधा झाली होती. योग्य उपचारानंतर ते करोनामुक्त झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या या बेघर केंद्रामध्ये ६३ जणांचे वास्तव्य असून यापैकी सहा जणांना अन्य आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ५७ जणांचे आज लसीकरण करण्यात आले. तसेच या ठिकाणी कार्यरत असलेल्या ९ सेवकांनाही करोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तसेच मिरज शहरामध्ये निराधार महिलांसाठी चालविण्यात येत असलेल्या आस्था बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांचेही लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination of 57 people in savali homeless shelter zws
First published on: 27-05-2021 at 01:21 IST