रायगड जिल्ह्यात यंदा विविध रंगी भात पिक लागवडीचे प्रयोग घेण्यात आले आहेत. गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ या प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा काळ्या रंगाच्या भाताची यशस्वी लागवड केली आहे. महत्वाची बाब म्हणजे सेंद्रीय पद्धतीने, कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता त्यांनी या भाताचे उत्पादन घेतले आहे.

यासाठी आत्मा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळा, लाल आणि जांभळ्या रंगाच्या भात प्रजातींचे ८४ क्विंटल बियाणे उपलब्घ करून देण्यात आले होते. यातून २१० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खुल्या बाजारात विविध रंगी भाताला चांगली किंमत मिळते ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रायोगिक तत्वावार ही लागवड करण्यात आली आहे.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Gutkha worth 21 lakh seized at different places in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

जिल्ह्यात यंदा १ लाख २४ हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी ९० लाख हेक्टरवर यंदा भात लागवड करण्यात आली आहे. भाताची उत्पादकता आणि उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अधुनिक भात लागवड पद्धती, आणि संकरीत बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र अजूनही पारंपारिक बियाण्यांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्याची उत्पादकता वाढण्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे.

हेही वाचा – Petrol-Diesel Price on 11 October: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संकरीत बियाणे लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी विभागाने आत्मा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात लाल, काळा आणि जांभळ्या रंगाचे भात उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ८४ क्विंटल संकरीत भात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. मध्यप्रदेश आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून यासाठी बियाणे मागविण्यात आले होते. या बियाण्यांचा वापर करून यंदा २१० हेक्टरवर लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.

खुल्या बाजारात या प्रकारच्या भातांना मोठी मागणी आहे. त्यास चांगला दरही मिळत आहे. हीबाब लक्षात घेऊन यंदा कृषी विभागाने विविध रंगी भात लागवडीचे प्रयोग घेतले आहे. शेतकऱ्यांचाही यास सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. गुळसुंदे येथील प्रयोगशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी काळ्या भात लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांच्या या प्रयोगाला यंदा चांगले यशही आले आहे.

ब्लॅक राईस हा फॉरबिडन्ट राईस म्हणूनही ओळखला जातो. जपानमधील तांदूळाची ही प्रजाती आहे. पूर्वी फक्त जपानमधील राजघराण्यातील लोकांसाठी या भाताची लागवड केली जात असे. १२० ते १३० दिवसांत या भाताचे उत्पादन मिळते. तांदळात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने, वजन कमी करण्यासाठी, तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. उकळल्यावर हा तांदूळ गडद जांभळ्या रंगाचा दिसतो असे मिनेश गाडगीळ सांगतात.

लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या या भातात प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक असल्याचे कृषी विभागाचे म्हणजे आहे. हा भात मधुमेह आणि इतर आजारातील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे अलिकडच्या काळात या प्रकारच्या भाताला मागणी वाढली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लाल, काळ्या आणि जांभळ्या रंग्याच्या भाताची लागवड करण्यात आली आहे.

शेतकरीवर्ग पारंपरिक भात पिकवण्यात व विकण्यात धन्यता मानतात, ज्याला जास्तीत जास्त २० रु प्रती किलो दर मिळू शकतो, परंतु काळ्या भाताची लागवड करून त्यानंतर स्वतः प्रोसेसिंग करून तांदूळ विकल्यास दिडशे रुपयांपर्यंत दर मिळू शकतो आणि म्हणूनच उत्पादन खर्च, बाजारभाव व नफा याची सांगड घालायची असेल तर नाविन्यपूर्ण उत्पादन घेण्याचा विचार शेतकऱ्यांकडून होण्याची गरज आहे. – मिनेश गाडगीळ, शेतकरी गुळसुंदे

हेही वाचा – “व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं…”, ठाकरे गटाचा टोला

काळ्या तांदुळात ‘ॲन्थोसॅयनीन’ हे नैसर्गिक पिग्मेट अढळते. बारीक पॉलिश तांदुळाची ‘ग्लॅयसेमिक इन्डेक्स’ जास्त असते तर लाल व आर एन आर तांदुळाची ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी असते, त्यामुळे सदर तांदुळाचा भात खाल्ल्यानंतर रक्तात साखर एकदम वाढल नाही. त्यामुळे डायबेटिस पेशंट सदर तांदुळाच्या भाताचा आपल्या आहारात वापर करू शकतात. वरील तांदुळात आयर्न, व्हीटॅमीन्स्, ॲन्टीऑक्सीड्न्ट जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळेच एक पुरक आहार म्हणून या तांदळाचा वापर होऊ शकतो.

ब्लॅक आणि परपल राईस लागवड सुरवातीला जपानमध्ये करण्यात आली होती. नंतर फिलीपिन्स, चीन, थायलॅण्ड, इंडोनेशीया, बांग्लादेश आणि भारतात याची लागवड केली जाऊ लागली. भारतात प्रामुख्याने मणिपूर आणि आसाममध्ये याची लागवड केली जाते. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या या भाताला चांगला दर मिळतो.