अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी बोललो नव्हतो. तसेच, अजित पवारांना पुन्हा संधी नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचललं आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार काय म्हणाले?

“अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी बोललोच नव्हतो. अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण, त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही. एखाद्या भूमिकेनंतर चुकीत बदल केला, तर ती संधी झाली. पहाटेच्या शपथविधीनंतर आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली, तर द्यायची नसते,” असं शरद पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : भाजपामध्ये येणार नाही असे जाहीर करा! मुनगंटीवारांचे वडेट्टीवार यांना आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येतात. तरी, शरद पवार जिद्दीने मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांचं कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचललं आहे. शरद पवार यांचं ते पाऊल नक्की यशस्वी होणार आहे.”

हेही वाचा : “तुमच्या घरी छापा पडला तर पक्षानं काय करायचं?” शरद पवारांनी हसन मुश्रीफांना सुनावलं!

“राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या २ खासदार आणि ९ आमदारांवर कारवाईची सुरुवात झाली आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.