पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा नेता विरोधकांकडे नाही, असा दावा भाजपाकडून सातत्याने केला जातो. अशा वेळी देशातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे कार्यकर्ते खासदार राहुल गांधींचा उल्लेख करतात. राहुल गांधी संसदेत पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या नेत्यांना भिडतात. परंतु, भारतीय जनता पार्टीचे ट्रोलर्स राहुल गांधींना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही. कधी त्यांच्या भाषणातल्या लहान-मोठ्या चुकांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल करून तर कधी मुलाखतींमधली एखादी चूक व्हायरल करतात. राहुल गांधींच्या विरोधकांनी नेहमीच राहुल गांधींचं प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. अशात राहुल गांधींचे समर्थक आणि काँग्रेसचे नेते कायम राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिले आहेत. परंतु, महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

विजय वडेट्टीवार पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. मी सलग सहा वेळा आमदार झालोय. कधीच पराभूत झालो नाही. यासाठी तुम्हाला चांगला वक्ता व्हावं लागेल. राजकारणात चांगला वक्ता होणं खूप गरजेचं आहे. राहुल गांधी उच्चशिक्षित आहेत. परंतु ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्ही चांगले वक्ते व्हा. तुम्हाला लोकांसमोर बोलता आलं पाहिजे. लोकांशी जोडण्यासाठी उदाहरणं देऊन बोललं पाहिजे.

rahul gandhi
काँग्रेसच्या अमेठीतील उमेदवाराबाबत संदिग्धता
Amethi Lok Sabha Election 2024
अमेठीमधून कोण निवडणूक लढवणार? राहुल गांधींनी वाढवला सस्पेन्स; म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे…”
ips abdur rahman marathi news, ips abdur rahman latest news in marathi
“लोकसभेच्या ४८ जागांवर काँग्रेस, भाजपकडून मुस्लिमांना प्रतिनिधीत्वच नाही”, वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांची टीका
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

हे ही वाचा >> “…तेव्हा यांना नग्न करेन”, संजय शिरसाटांचा ठाकरे गटाला इशारा; म्हणाले, “मला एकनाथ शिंदेंनी…”

विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत असं वक्तव्य करून राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला आहे. वडेट्टीवारांचं हे वक्तव्य चर्चेत असून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ शकतात. विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जाऊ लागू शकतं, असं बोललं जात आहे.