उल्हासनगरमधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले असून ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या गोळीबाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत.

उल्हासगरमधील गोळीबाराच्या घटनेबाबत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी हल्ल्यानंतर गणपत गायकवाड काय म्हणाले होते त्याबद्दल काही दावे केले आहेत.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, ते भाजपाशीसुद्धा गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार जन्माला येतील. शिंदे हे महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझे कोट्यवधी रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या, पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही, हे महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हल्ल्यावेळचे शब्द आहेत.

वडेट्टीवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला आज काही गोष्टींची खात्री पटलेली आहे की, एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार हे गद्दार आहेत आणि हे भाजपालादेखील मान्य आहे. स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट एकमेकांशी गद्दारी करतील. महाराष्ट्रात आज गुन्हेगार आणि गुंडांचं राज्य आहे, त्यामुळे सामान्य माणसाला घाबरून गप्प बसण्यापलीकडे पर्याय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गुंडांची जी दादागिरी महाराष्ट्रभर सुरू आहे त्याची पूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती, असे खुद्द भाजपा आमदार सांगत आहे, तरी यावर कारवाई होत नाही.

हे ही वाचा >> “घटना दुर्दैवी…महेश गायकवाडांनी लवकर बरे व्हावे”, मुख्यमंत्र्यांची गोळीबार प्रकरणानंतर पहिली प्रतिक्रिया

वडेट्टीवार म्हणाले, महायुतीने सुसंस्कृत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करत आहे, सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहे, सत्तेचा माज, बंदुकीचा वापर, बदला हे सगळं आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. महाराष्ट्रात जे सुरू आहे तीच खरी मोदींची गॅरंटी आहे!