देवळाली कॅम्प येथील एका गतिमंद युवतीवर बलात्कार प्रकरणी कर्नल विनोद सहानी यांना अटक करण्यात आली आहे. संशयित तोफखाना केंद्राच्या डेपो विभागात कार्यरत आहे. युवतीच्या घरात कोणी नसताना त्याने प्रवेश करून लैगिंक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
देवळाली कॅम्प छावणी मंडळालगत लष्कराच्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. केंद्रातील डेपो विभागात कार्यरत असणारा सहानी संसरी भागात वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ पीडित मुलगी वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री मुलीची आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी सहानीने घरात प्रवेश केला आणि मुलीवर लैगिंक अत्याचार केला. या घटनेची माहिती समजल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सहानी यांच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod sahni arrested in rape case
First published on: 03-05-2015 at 03:24 IST