साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मनुवादय़ांचे अथवा परशुरामाचे समर्थन केल्यास त्यांना साताऱ्यातच काय, कोठेही काळे फासू, असे प्रतिआव्हान ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिले. अखिल भारतीय साहित्य संमेलन पूर्णत: ब्राह्न्णी विचारांचे आणि रा. स्व. संघाचे नियंत्रण असणारे होते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
चिपळूण संमेलनाच्या समारोपात संमेलनाध्यक्ष डॉ.कोत्तापल्ले यांनी केलेल्या जोरदार आरोपांचा समाचार माने यांनी पत्रकार परिषदेत घेतला. ते म्हणाले,‘‘डॉ. कोत्तापल्लेंच्या उपस्थितीत संमेलनात परशुराम आणि कुऱ्हाड हे पटले नाही. प्रतिगामी प्रतीके पुढे येत असताना, तुम्ही कोणत्या बाजूचे आहात? मी त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनावर टीका केलेली नव्हती. आम्ही परशुराम काढायला लावला आणि तो मागच्या दाराने आणला गेला. तात्त्विक प्रश्न विचारले असताना, मुदय़ाला बगल देवून डॉ. कोत्तापल्ले बोलले. पुढाऱ्यांच्या मागे फिरून ‘पद्मश्री’ सारखे पुरस्कार मिळत असते तर, असे पुरस्कार राज्यकर्त्यांच्या नातेवाईक व हितचिंतकांना मिळाले नसते का? त्यांनी या संदर्भात केलेली टीका म्हणजे पद्मश्रीसारख्या राष्ट्रीय किताबाचा अवमानच आहे. तुम्ही कुलगुरू झालात ते कसे, काचेच्या घरात राहून दगड मारू नका, असा इशारा माने यांनी दिला. संमेलनाला आमदारांनी दिलेले व मुख्यमंत्र्यांच्या निधीतील असे एक कोटी रूपये देण्यात आले असल्यानेच आम्ही बोलतोय. हा पैसा दुष्काळाला दिला असता तर तहानलेल्यांना पाणी मिळाले असते. बहुजन समाजातील व्यक्तीला पुढे करायचे अन् ऐनवेळेला आपला अजेंडा पुढे करायचा हे आजवर या संमेलनात चालतच आल्ांय अशीही टीका त्यांनी केली. आम्ही १९७६ ला संमेलन उधळलंय. संघर्षांचा आम्हाला सराव आहे. शासनकर्ते दलित संमेलनांना पैसा का देत नाहीत, असा सवाल करून, मतपेटय़ा त्यांच्याकडे नाहीत, तरी फटका बसेल, असा इशाराही लक्ष्मण माने यांनी राज्यकर्त्यांना दिला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
कोत्तापल्लेंना कोठेही काळे फासू – लक्ष्मण माने
साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मनुवादय़ांचे अथवा परशुरामाचे समर्थन केल्यास त्यांना साताऱ्यातच काय, कोठेही काळे फासू, असे प्रतिआव्हान ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिले. अखिल भारतीय साहित्य संमेलन पूर्णत: ब्राह्न्णी विचारांचे आणि रा. स्व. संघाचे नियंत्रण असणारे होते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
First published on: 15-01-2013 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will blackwash anywere to kothapalli laxman mane