कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये राणे कुटुंब आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातला संघर्ष सर्वश्रूत आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांनी २०१९ च्या आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव केला होता. राऊत म्हणाले की, “निलेश राणे सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु आपण त्यांना त्या निवडणुकीतदेखील पराभूत करायचं.”

खासदार राऊत म्हणाले की, “त्यांचं (निलेश राणे) सध्या गुडघ्याला फेटा बांधून फिरणं सुरू आहे. म्हणे विधानसभेला लढणार आहेत. लोकसभेला त्यांना दोनदा आपटलं आहे. आता एकदा विधानसभेला आपटायचा पराक्रम करायचा आहे. या मालवण आणि कुडाळ मतदारसंघात त्यांना पुन्हा एकदा पराभूत करू.” सिंधुदूर्ग येथील एका सभेत राऊत बोलत होते.

हे ही वाचा >> “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राऊत यांनी शिवसेना सोडून शिंदे गाटाची वाट धरणाऱ्या नेत्यांवरदेखील हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर द्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे दीपक सावंत यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोघांवर हल्लाबोल करत राऊत म्हणाले की, “ज्यांचे हात बरबटलेले आहेत तेच लोक शिंदेसोबत जातात.”