आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशात इतर प्रश्न उगाच समोर आणले जात आहेत. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच महाविकास आघाडी मजबूत आहे, महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे देशात तो भाजपाविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर आपण केरळपासून सुरुवात करु केरळमध्ये भाजपा आहे का? नाही. तामिळनाडू, तेलंगण, आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्येही त्यांची सत्ता नाही. गोव्यात आमदार फोडून राज्य आणलं. महाराष्ट्रातही तेच केलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही. २०२४ ला लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड राहिला कायम राहिला तर बदल घडेल हे सांगायला ज्योतिषांची गरज नाही.

लव्ह जिहाद विषयी काय म्हणाले आहेत शरद पवार?

शरद पवार यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला की लव्ह जिहादची प्रकरणं देशात वाढत आहेत अशी चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. कारण नसताना समाजा-समाजात तेढ वाढवतो. या सगळ्या गोष्टींसंबंधी मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये.”

maldives president mohamed muizzu marathi news
विश्लेषण: मालदीवमध्ये चीनधार्जिण्या अध्यक्षांचा ‘दुसरा’ विजय… भारतासाठी हा निकाल किती महत्त्वाचा?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

केरळमध्ये चर्चेसवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो. समजा एखाद्याची चूक झाली असेल तर चर्चेसवर हल्ला करण्याचं कारण काय? या हल्ल्यांमागे विशिष्ट विचारधारा दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांना संरक्षण देण्याची गरज आहे. आदिवासी आणि दलित समाज या घटकांना जपणं हेदेखील सरकारचं काम आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.