वॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह व्हीडिओ टाकून भावना भडकवल्याच्या आरोपावरून नळेगाव व वडवळ नागनाथ येथील चौघांना बुधवारी  रात्री चाकूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. चाकूर तालुक्यातील नळेगाव भागात बुधवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक महंतेश कोणदे, शिपाई अविनाश िशदे हे गस्त घालत होते. गावातील अनेकांच्या मोबाईलवर आक्षेपार्ह व्हीडिओ असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता नळेगाव येथील ग्रुप प्रमुख (अ‍ॅडमिन) संतोष बच्रे हा संबंधित व्हिडिओसाठी कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बच्रेला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता दुसऱ्या ग्रुपमधील वडवळ नागनाथ येथील मनोज लव्हराळे व नळेगाव येथील राजकुमार तेलंगे, अमोल सोमवंशी हेही दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चाकूर पोलिसात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp admin arrested for posting objectionable video
First published on: 09-10-2015 at 00:01 IST