शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी एका टोळीला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला. राऊतांच्या या आरोपानंतर ठाण्यातील गुंड राजा ठाकूर नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा- “हा राजकीयदृष्ट्या मला संपवण्याचा कट”, अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “ते पत्र…!”

राजा ठाकूर नेमका कोण आहे?

जानेवारी २०११ मध्ये ठाणे-बेलापूर रस्त्यावर कळवा येथील विटावा पुलाखाली दीपक पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी रविचंद ठाकूर उर्फ राजा ठाकूर होता. या प्रकरणी राजा ठाकूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण एप्रिल २०१९ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.

हेही वाचा- “श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली”; संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांना लिहिले पत्र; म्हणाले, “एक कुख्यात गुंड…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजा ठाकूर पुन्हा पोलिसांसमोर हजर न होता, तो फरार झाला. यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने येऊरच्या साई ढाबा येथे सापळा रचून राजा ठाकूरला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पुन्हा जामिनावर सुटलेल्या ठाकूर याने एकनाथ गटाचा राजाश्रय मिळवला. या काळात राजा ठाकूरने खासदार श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय अशी ओळख निर्माण केली आणि ठाण्यात पुन्हा दहशत निर्माण केली. त्याचबरोबर दोन आठवड्यांपूर्वी ठाण्यात शिंदे पितापुत्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकूर याने भव्य कबड्डी सामान्यांचे आयोजन करत शहरभर शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनरही लावले होते.