विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले हरिभाऊ बागडे हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. शाळेत असताना पेपर विक्री, आमदार, मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा बागडेंचा आजवरचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे बागडेंच्या रूपाने सर्वसामांन्यांशी नातं सांगणारा नवा विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला आहे.

भाजपच्या हरिभाऊ बागडेंची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड 

naxal leader joganna killed marathi news, joganna naxal leader death
गडचिरोलीत सक्रिय जहाल नक्षल नेता जोगन्ना अबुझमाडच्या चकमकीत ठार, शंभरहून अधिक गुन्ह्यांत आरोपी
Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !

सत्तर वर्षीय बागडेंची राहणी आजही अत्यंत साधी आहे.  पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोषाख. सुरूवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणा-या बागडे यांनी १९८५ साली पहिल्यांदा आमदारकीची म्हणून निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर ते निवडून आलेले आहेत.

हरिभाऊ बागडे मराठा समाजाचे असून त्यांच्या निमित्ताने विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाडय़ाला मिळाले आहे. १९९५ ते ९७ दरम्यान ते मंत्री होते आणि १९९७ ते ९९ दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपददेखिल त्यांनी सांभाळले. बागडे यांनी राजकारणात असूनही कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्त्व दिले, असं त्यांचे कुटुंबिय सांगतात.