दोन वर्षांच्या चिमुकलीसह महिलेची रेल्वेसमोर येऊन आत्महत्या!

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ घडली घटना

woman commits suicide in front of train
एक्सप्रेसच्या जोरदार धडकेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. (संग्रहित छायाचित्र)

-दत्तात्रय भरोदे
दोन वर्षांच्या मुलीसह एका महिलेने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ काल (शनिवार) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हेमांगी रेपे व संस्कृती रेपे अशी या मायलेकींची नावे असून त्या उल्हासनगर येथे रहाणाऱ्या आहेत.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकानजीक अप सिग्नल जवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेस समोर येऊन हेमांगी रेपे (२८) व संस्कृती रेपे (२) त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली. एक्सप्रेसच्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: With two year old girl woman commits suicide in front of train msr

ताज्या बातम्या