हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील एका शेततळय़ात बुडून माय-लेकराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जिजाबाई विठ्ठल मगर (वय ४५) व प्रभाकर विठ्ठल मगर (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. आपल्याच शेतात काम करण्यासाठी प्रभाकर व जिजाबाई हे गेले होते. दुपारच्या सुमारास प्रभाकरला तहान लागली. पाणी पिण्यासाठी म्हणून तो शेततळय़ावर गेला. तेथे पाय घसरून तो तलावात पडला. हे लक्षात येताच प्रभाकरला वाचविण्यासाठी जिजाबाईंनी शेततळय़ात उडी घेतली. या दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आपल्या पथकासह घटनास्थळावर पोहोचले. सायंकाळपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूरला पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women died while trying to save her drowning son in a farm pond
First published on: 10-08-2018 at 00:10 IST