scorecardresearch

नारीशक्तीचा विजय, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये बुधवारी हातघाई झाली होती.

trimbakeshwar temple, त्र्यंबकेश्वर मंदिर , hc, HC, Maharashtra, women movement, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
trimbakeshwar temple : काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

स्वराज्य संघटनेच्या प्रमुख विनीता गुट्टेंसह अन्य महिलांनी गुरूवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केला. आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात या महिलांनी गर्भगृहात प्रवेश करून त्र्यंबकेश्वराला अभिषेक घातला. गेल्या काही दिवसांपासून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यास मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थ विरोध करत होते. याच कारणावरून स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये बुधवारी हातघाई झाली होती.
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त व आंदोलकांमध्ये आरोप-प्रत्यारोप 
आंदोलनकर्त्यां महिलांना ग्रामस्थांनी चोप देत जबरदस्तीने मंदिर परिसरातून बाहेर काढल्या प्रकरणी माजी नगराध्यक्षांसह १५० ग्रामस्थांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात महिलांनी गर्भगृहात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय? 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-04-2016 at 07:28 IST

संबंधित बातम्या