मालेगाव – कर्नाटकात उद्भवलेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद संवेदनशील अशा मालेगावातही उमटले आहेत. गुरुवारी हिजाबच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात शेकडो महिला एकवटल्या होत्या. घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत या महिलांनी कर्नाटकमधील घटनेचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमेतूल उलेमा या संघटनेतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह अन्य धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मेळाव्यास मोठय़ा प्रमाणावर उपस्थित महिलांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते. तसेच हिजाब घालण्याचा महिलांना मिळालेला अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नसल्याचे म्हणत या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी महिलांनी केली. मेळाव्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांचा आदेश झुगारुन हा मेळावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी हिजाब दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

More Stories onहिजाबHijab
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women rally in support of hijab in malegaon akp
First published on: 11-02-2022 at 00:07 IST