Women’s Day 2019 : १४ महिला, १४ भाषा आणि १४ विचार, गुगलचा नारीशक्तीला सलाम
जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व अधोरेखित करताना गुगलनंही खास डुडल तयार करून स्त्री शक्तीला सलाम केला आहे…सविस्तर वाचा…

– महिलादिनी एअर इंडियाच्या सर्व विमानांचे सारथ्य महिला पायलट्सकडे
देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने आज (८ मार्च) महिला दिनानिमित्त एक चांगली घोषणा केली आहे. त्यानुसार, आज दिवसभरातील सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याद्वारे एअर इंडियाकडून महिला शक्तीचा जागर केला जाणार आहे…वाचा सविस्तर

Women’s Day 2019 – हमिदा खान: महाराष्ट्रातील ४०० हून अधिक गड- किल्ले सर करणारी ‘हिरकणी’
गड- किल्ले फिरणं ही एक धुंदी असते… आणि जो ती धुंदी अनुभवतो त्यालाच ती जाणवते. गड- किल्ले फिरल्यावर आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल जास्त आपुलकी वाटू लागते. अशीच एक धुंदी जोपासत आहेत मुंबईत राहणाऱ्या हमिदा खान…वाचा सविस्तर

देवदासींना अखेरच्या श्वासानंतरही साथ देणारी ‘बाई माणूस’
महिलांची सुख-दुःख केवळ महिलाच समजू शकतात असं म्हटलं जातं, ते खरंही आहे. कारण असंच एक उदाहरण पुण्यात पहायला मिळालं आहे. समाजासाठी भोगवस्तू ठरलेल्या महिलांच्या अर्थात देवदासींच्या अडीअडचणींच्या काळात सदैव त्यांच्यासोबत राहणाऱ्या अलका गुजनाळ या बाई माणसाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची आठवण येणं अपेक्षित आहे.
वाचा सविस्तर

आयटी, मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रान्सजेंडर हृषिकाचा संघर्षमय प्रवास

विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून देशभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी अविस्मरणीय आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांची आवर्जुन आठवण काढली जाते, त्यांना गौरविण्यात येते. आजच्या या महिलादिनानिमित्त अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाच्या संघर्षाची कहाणी आम्ही तुमच्यासमोर आणली आहे. आपल्या सर्वसामान्य समाजाने कायमच दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर समाजातील ही व्यक्ती असून अनेक अडचणींचा सामना करीत या व्यक्तीने आयटी क्षेत्रात आपले बस्तान बसवले. या ठिकाणी आधुनिक जगाशी जुळवून घेत प्रतिष्ठेचं जीवन ती आज जगत आहे. हृषिका शर्मा असे या प्रेरणादायी व्यक्तीचे नाव असून तिच्या संघर्षमय जीवनाचा घेतलेला हा वेध…सविस्तर वाचा…

Women’s Day 2019 : आरणीतील महिलांचा ‘करार शेती’चा यशस्वी प्रयोग
कर्जबाजारीपणा आणि त्यातून वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्या हे दुष्टचक्र सुरू असताना त्यातून बाहेर पडण्याचा सक्षम मार्ग दाखवला आहे लोहारा तालुक्यातील आरणी गावच्या ‘सावित्रीच्या लेकीं’नी! ‘जय भीम महिला बचत गटा’च्या माध्यमातून दहा महिलांनी ‘करार शेती’ नावाचा केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. त्यातून कर्जबाजारीपणातून कसे सुटायचे, या प्रश्नाला ‘कष्ट’ हेच उत्तर मिळाले. घरातील कर्त्यां हाताला आर्थिक बळ देण्याचे काम या महिलांनी केले असून कर्जामुळे येणाऱ्या नराश्यावर ही ‘करार शेती’ म्हणजे ‘भीमबाण’ असल्याची प्रतिक्रिया बचत गटातील महिला व्यक्त करतात..सविस्तर वाचा….

Women’s Day 2019 : बचतगटाच्या ‘पंचकन्या’ देशाचे नाव उज्ज्वल करणार

मजूर नवऱ्यासोबत संसार करताना जाणवणाऱ्या चणचणीपोटी स्वत: तूटपूंज्या भांडवलावर व्यवसाय यशस्वी केला. सर्वत्र नाव झाले. व्यावहारिक ज्ञान घेण्यासाठी मिळालेला विदेशवारीच्या संधीचाही फायदा झाला. आता विदेशातून पहिला ‘ऑर्डर’ मिळालेल्या बचतगटाच्या ‘पंचकन्या’ देशाचे नाव उज्ज्वल करण्यास सज्ज झाल्या आहेत..वाचा सविस्तर…

Women’s Day 2019 : बंजारा पेहराव – वसंतनगर ते न्यूयॉर्कपर्यंत प्रवास
औरंगाबाद : पारंपरिक पेहरावाला नावीन्यपूर्ण कल्पकतेची जोड देऊन नव्या कलाकृती निर्माण करण्याची कला साधली तर ती स्वत:सह इतर सहकाऱ्यांच्याही अर्थार्जनासाठीचे नवे दालन खुले करून देऊ शकते, याचे उदाहरण समोर ठेवले ते तांडय़ावरील एका अल्पशिक्षित महिलेने. यातून त्या महिलेचा प्रवास पार थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टनपर्यंत घडून गेला...वाचा सविस्तर

Women’s Day 2019 : मंदाताई आमटेंसह १६ प्रभावशाली महिलांनी जिंकला ‘आय वुमन ग्लोबल अॅवॉर्ड’
वैद्यकीय डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे यांच्यासह विविध क्षेत्रातील १६ प्रभावशाली महिलांना यंदाचा प्रतिष्ठित आय वुमन ग्लोबल अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांना या अॅवॉर्डने गौरविण्यात येते. च गडचिरोलीतल्या दुर्गम भागातील माडिया गोंड आदिवासी महिलांमधील आरोग्यासंबंधी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मंदाताईंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे..वाचा सविस्तर

Women’s Day 2019 : महिलांना गिफ्ट देताय ? ‘या’ पर्यायांचा नक्की विचार करा
महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. त्यामुळे जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. या दिवशी मुख्यत्वेकरुन महिलांना एखादी भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र अनेक वेळा महिलांना कोणती भेटवस्तू द्यावी याविषयी पुरुषांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातल्या स्त्रियांना एखादं गिफ्ट द्यायचं असेल तर या पर्यायांचा नक्कीच विचार करायला हवा…वाचा सविस्तर

Women’s Day 2019 : मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी आता इमोजीचा आधार
international womens Day 2019 : सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखल झालेल्या मासिक पाळीबद्दलच्या इमोजीला स्त्रियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ४७% स्त्रिया असे म्हणत आहेत की, या इमोजीमुळे त्यांना मासिक पाळीबद्दल अधिक उघडपणे बोलता येईल. स्त्रियांच्या मनातल्या गुजगोष्टींना, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षांना संवादाचे खुले आकाश मिळावे यासाठीच्या उपक्रमांमध्ये या इमोजीला गणले जात आहे.वाचा सविस्तर…

Women’s Day 2019 : बॉलिवूडच्या ‘सुपरवूमन’! अभिनेत्याशिवाय गाजवले ‘हे’ चित्रपट
international womens Day 2019 : जगभरामध्ये महिलांच्या सन्मानासाठी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. कलाक्षेत्रही याला अपवाद नाही. बॉलिवूड असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो येथेही महिलांनी स्वत: ला सिद्ध केलं आहे. कलाक्षेत्रामध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये असेही काही चित्रपट आहेत जे केवळ अभिनेत्रींमुळे सुपरहिट ठरले आहेत. चला तर मग पाहुयात अभिनेत्रींनी गाजवलेले काही चित्रपट –..वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Women’s Day 2019 : मराठी कलाकारांचा स्त्रीशक्तीला सलाम
समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील निपुणतेने पार पाडत असते. त्यामुळे सर्वच क्षेत्राच स्वत: ला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांना लोकप्रिय कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच महिलांना सलामही केला आहे. वाचा सविस्तर