नांदगावपेठ क्षेपणास्त्र प्रकल्पाचे काम ठप्पच

अमरावतीनजीकच्या नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्स लिमिटेडने (बीडीएल) क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्यास दशकभरापूर्वी मंजुरी दिली होती.

|| मोहन अटाळकर

अमरावती : भारत डायनॉमिक्स लिमिटेडचा पाचवा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला असताना दहा वर्षे उलटूनही या कंपनीच्या नांदगावपेठ येथील चौथ्या प्रस्तावित क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाचे काम मात्र थांबले आहे.

अमरावतीनजीकच्या नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्स लिमिटेडने (बीडीएल) क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्यास दशकभरापूर्वी मंजुरी दिली होती. ११ डिसेंबर २०११ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले. पण त्यानंतर या प्रकल्पाचे काम इंचभरही पुढे सरकू शकलेले नाही. के वळ संरक्षण भिंत उभारण्यात आली. या भिंतीचा काही भाग पावसामुळे नुकताच कोसळला. या प्रकल्पात हवेतून मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांबाहेर प्रथमच अमरावतीत चौथा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने या कारखान्याच्या बाबतीत उत्सुकता ताणली गेली होती. पाचवा प्रकल्प आंध्र प्रदेशातील इब्राहिमपत्तनम येथे मंजूर झाला. या प्रकल्पामधून संरक्षण साधनांची निर्मिती देखील सुरू झाली आहे.

दुसरीकडे, आधी मंजूर झालेल्या नांदगावपेठ येथील प्रकल्पाचे काम मात्र ठप्प पडले आहे. या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ५३३ एकर जमीन देण्यात आली आहे. भारत डायनॉमिक्स या प्रकल्पासाठी सुरुवातीला २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास गुंतवणूक ८२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल.

१९७० मध्ये सशस्त्र दलांची गरज पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे व संबंधित संरक्षण उपकरणे उत्पादित करण्यासाठी बीडीएलची स्थापना करण्यात आली होती. फ्रान्सच्या एरोस्पाटियाल यांच्या तांत्रिक सहकार्याने अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (एटीजीएम) निर्मितीचे काम बीडीएलने सुरू केले आहे. कं पनी आता अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा बनविण्यासाठी डीआरडीओ आणि सशस्त्र दलांसह भागीदारीत कार्य करते.भारत सरकारकडून मिळालेल्या मागणी आणि परवानग्यांच्या आधारे अधिक निर्यातीसाठी प्रयत्न के ले जात आहेत. बीडीएल कंपनी सध्या जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, टारपीडो, साधक आधारित मल्टीरोल एअर डिफेन्स क्षेपणास्त्र किंवा एमआरएसएएम, मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून आकाशात मारा करणारे  क्षेपणास्त्र अशा शस्त्रास्त्रांची निर्मिती करते.

भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून उपलब्ध होणाऱ्या मागणीच्या आधारे उत्पादने तयार के ली जातात, अनेक शस्त्रास्त्रे डीआरडीओ, आयएआय (इस्त्रायल) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहेत.

अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करताना तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी  विविध उत्पादकांसोबत संयुक्त करार करण्यात येत आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) मध्ये ही कं पनी नोंदणीकृ त आहे.

मागील वर्षी कं पनीची उलाढाल ३,०६९ कोटी होती.  अमरावती येथे नव्या सुविधेसाठी ऑर्डर मिळाल्यावर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शके ल, अशी माहिती बीडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमोडोर (निवृत्त) सिद्धार्थ मिश्रा यांनी कं पनीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्र मात दिली होती. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा घालून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प के व्हा सुरू होईल, याबाबत अनिश्चितता आहे.

संरक्षण भिंत कोसळली

भारत डायनॅमिक कंपनीच्या सुरक्षा भिंतीचा काही भाग नुकताच पावसाने कोसळला. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाच वर्षांत ही भिंत दोन वेळा कोसळली आहे. पावसाने निकृ ष्ट दर्जाचे काम उघड के ले आहे. सावर्डीनजीक महामार्गालगतची जमीन भारत डायनॅमिक कंपनीने अधिग्रहित केलेली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधण्यात आली. परंतु, भिंत बांधताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे आजवर दोनवेळा ही भिंत कोसळल्याचा आरोप होत आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी येथील खासदार नवनीत राणा यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रकल्पामुळे येथील औद्योगिक विकासाला चालना मिळू शके ल. पण, याकडे खासदारांचे दुर्लक्ष आहे. एकीकडे अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवेदने देत फिरणाऱ्या खासदारांनी बीडीएलचे काम सुरू व्हावे, यासाठी काय प्रयत्न

के ले, हे सांगितले पाहिजे. संरक्षण मंत्रालयाकडून उत्पादनांच्या मागणीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर हा प्रकल्प सुरू होऊ शकेल, अशी स्थिती आहे. त्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. –अनंत गुढे, माजी खासदार, अमरावती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Work on nandgaonpeth missile project stalled akp