शहराच्या वानखेडेनगर व विशालनगर भागात युद्धपातळीवर नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. येथे १०० एमएमची नवीन डीआय जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. कैसर कॉलनी गल्ली नं. १ मध्येही २२ मीटर लांब १०० एमएमची नवीन डीआय जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, या भागातही तीव्र पाणीटंचाई आहे.
‘एसीडब्ल्यूयूसीएल’कडून गेल्या १ जूनपासून हायड्रोलिक मॉडेल आधारित नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच इतर भागातही काम करण्यात येईल. दरम्यान, शिवाजीनगर डी सेक्टर भागात सुरू करण्यात आलेले काम पूर्ण होऊन नवीन जलवाहिनीतून बुधवारी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या ठिकाणी १०० एमएमची १२४ मीटर जलवाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे सुमारे ५० घरांना याचा फायदा झाल्याचे देखभाल-दुरुस्ती विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, एन ११ येथे स्मशानभूमीसमोर ५०० एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली. या वाहिनीचा वापर हरसिद्धी व हर्सूल जलकुंभ भरण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे हे जलकुंभ वेळेत भरण्यात मदत होईल. ग्राहकांना तक्रारी निवारण करण्यासाठी सरळ संपर्क साधता यावा, म्हणून ६ ग्राहक सेवा केंद्रे आहेत. आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास सेवा उपलब्ध असणाऱ्या ०२४०-६६५५००० या क्रमांकावर ग्राहक संपर्क साधू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work start of new water pipeline to wankhede nagar vishal nagar
First published on: 11-06-2015 at 01:20 IST