यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने अहमदनगरला येत होत्या. यावेळी हायवेवर शिरुरजवळ दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली आणि वाद झाला. यादरम्यान दुचाकीवर स्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला.

पोलीस सध्या दुचाकीस्वाकाचा शोध घेत आहेत. यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तपासासाठी पोलीस हायवेवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहत आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलेला नाही. रेखा जरे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashswnini mahila brigade president rekha jare murder sgy
First published on: 01-12-2020 at 08:51 IST