International Yoga Day  आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह योगासनं केली. नांदेडमध्येही योग दिवस साजरा झाला. सगळ्या जगाने योग स्वीकारला याचा मला अभिमान वाटतो आणि हे शक्य झालं ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच.

योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा जगभरात पोहचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आपल्या देशाची प्राचीन परंपरा सगळ्या जगानं स्वीकारली ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भारतात योग पोहचवण्याचं काम रामदेवबाबांनीही केलं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे असं म्हणत त्यांनी योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी योगासनांच्या विविध कसरतीही सादर करण्यात आल्या. त्यानंतर बाबारामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग पोहचवला याबाबत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. योग हा आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारा भाग आहे, आपल्याला योग निरोगी ठेवण्यास मदत करतो असंही प्रतिपादन बाबा रामदेव यांनी केलं.