सांगली : एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर केलेल्या अत्याचाराची काही वर्षांपूर्वी दिलेली तक्रार तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या दबावामुळे आपण मागे घेतली असून, याची फेरचौकशी करण्याची मागणी संबंधित तरुणीने आज येथे पत्रकार परिषदेत केली.

स्पर्धा परीक्षेत मदत करण्याच्या बहाण्याने या पोलीस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याची तक्रार संबंधित तरुणीने केली होती. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेने आज पत्रकार बैठकीत केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान, तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले होते. तक्रार मागे घेऊनही संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून वारंवार त्रास दिला जात आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकारी, तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित तरुणीने या वेळी केली.