रत्नागिरी : ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि धर्मविरोधी स्टेटस व्हॉटसअॅपवर ठेवल्याने रत्नागिरीत एका तरुणाला त्याच परिसरातील तरुणांनी देशप्रेम दाखवले. भारत विरोधी स्टेटस ठेवल्याने त्या तरुणाला बेदम मार देत. देशद्रोहाचा गुन्हा उशिरा नोंदवण्यात आला. भारतविरोधी तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे धर्मविरोधी मोबाईल स्टेटस ठेवल्याने रत्नागिरीत संतप्त भावना निर्माण झाल्या.
रत्नागिरी शहरानजीक जांभूळ फाटा येथे मोहम्मद बदरुद्दीन परकार ( वय २१, मुळ रा. केजीएम प्लाझा गोवळकोट, चिपळूण सध्या रा. महादेवनगर, रत्नागिरी) या तरुणाला बेदम चोप देण्यात आला. त्यांनतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. देशद्रोह करणा-या या तरुणाला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवार ८ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जांभूळफाटा येथे घडली.
पाकिस्तान विषयी प्रेम आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दाखवणा-या मोहम्मद परकार याने बुधवारी रात्री आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअॅपवरील स्टेटसमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ तसेच भारतविरोधी व धर्मविरोधी स्टेटस ठेवले. ही बाब त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी गुरुवारी दुपारी मोहम्मद परकारला जांफूळफाटा येथे बोलावले.
आणि त्याला हाताचे ठोसे, लाकडाचा वापर करत बेदम मारहाण केली. यावेळी तो गंभीर दुखापत झाल्याने मोहम्मद याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर त्याला असलेला धोका लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात देश विरोधी स्टेटस ठेवल्याप्रकरणी मोहम्मद परकार विरोधात भादंवि कायदा कलम ३२४ तसेच १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.