News Flash

ऋषी कपूर बिग बींना म्हणतायत, ‘बच्चे की जान लोगे क्या?’

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर जवळपास २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.

big b rishi kapoor
अमिताभ बच्चन, ऋषी कपूर

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर जवळपास २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या आगामी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बच्चे की जान’ या गाण्यात बिग बी आणि ऋषी कपूर यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यात वडिल्यांच्या भूमिकेत असून, ऋषी कपूर ७५ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. अरिजीत सिंगच्या आवाजातील या मजेशीर गाण्यात बिग बी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूर यांना पत्नीला प्रेमपत्र लिहिण्यास सांगतात. हेच प्रेमपत्र लिहिताना ऋषी कपूर यांची कशी दमछाक होते आणि त्याचा बिग बी कसा आनंद लुटतात, हे गमतीशीर पद्धतीने या गाण्यात दाखवण्यात आलं आहे.

वाचा : ‘हम साथ साथ है’मधील सलमानच्या सहकलाकाराला बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याच्या धमक्या

‘१०२ नॉट आऊट’च्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहता प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खऱ्या अर्थाने परवणी ठरणार आहे असंच म्हणावं लागेल. उमेश शुक्ला दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाला असणारी विनोदी झाक आणि या दोन्ही कलाकारांचा दमदार अभिनय ही चित्रपटाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे. वडिल आणि मुलाच्या हटके नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट ४ मे ला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 6:10 pm

Web Title: 102 not out song bacche ki jaan amitabh bachchan rishi kapoor
Next Stories
1 प्रिन्स हॅरी- मेगननं लग्नासाठी पाहुण्यांकडून मागितला अनोखा आहेर
2 या महिला गुप्तहेराने केले होते पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न
3 ‘हम साथ साथ है’मधील सलमानच्या सहकलाकाराला बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याच्या धमक्या
Just Now!
X