सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ 2.0’ हा चित्रपट येत्या २९ तारखेला जगभरात प्रदर्शित होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असलेला पहिला चित्रपट म्हणून ‘ 2.0’ कडे पाहिलं जातं. विएफएक्स आणि इतर तंत्रज्ञानाची सांगड घालून तयार करण्यात आलेला हा चित्रपट पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत. विशेष म्हणजेच ‘ 2.0’ हा फक्त चित्रपट नसून भारतीय सिनेसृष्टीचा अभिमान आहे असे कौतुकोद्गार रजनीकांत यांनी काढले आहे.

मी आणि रजनीकांत सेटवर मराठीतच बोलायचो – अक्षय

‘तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ ‘ 2.0′ मध्ये घालण्यात आला आहे. केवळ मनोरंजन एवढाच उद्धेश या चित्रपटाचा नसून यात सामाजिक संदेशही दडला आहे. म्हणूनच हा चित्रपट यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. हा चित्रपट नक्कीच सिनेसृष्टीचा अभिमान आहे’ असं म्हणत रजनीकांत यांनी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपलं मनोगत व्यक्त केलं. ‘माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होताना जेवढी धाकधूक, उत्साह , आनंद मला वाटत होता त्याच भावना माझ्या मनात ‘ 2.0’ च्या प्रदर्शनाआधी निर्माण होत आहेत असंही रजनीकांत म्हणाले.

2.0 मधील ‘या’ ७ सीनवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

या चित्रपटासाठी जगभरातील ३००० हून अधिक तज्ज्ञांनी काम केलं असून त्यापैकी १००० व्हीएफएक्स तज्ज्ञ आहेत. ‘2.0’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक बजेटचा दुसरा चित्रपट आहे. त्याप्रमाणे थेट 3D कॅमेऱ्याने शूट करण्यात आलेला हा देशातला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटासाठी ५०० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले. चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय कुमार आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत आहे.