News Flash

बॉलीवूडचा नवा रेकॉर्ड!

बॉलीवूडचे रॉकस्टार रणवीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे आगामी 'बॉम्बे वेल्वेट' चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

| July 8, 2014 09:24 am

बॉलीवूडचे रॉकस्टार रणवीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे आगामी ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ मध्ये ६०च्या दशकातील मुंबई दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाला जास्तीत जास्त वास्तववादी रुप देण्यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यपचे जोरात प्रयत्न सुरु आहेत. अनुराग या चित्रपटासाठी श्रीलंकेतून २०० विंटेज गाड्या मागवणार आहे. यापूर्वी, कोणत्याच बॉलीवूड चित्रपटात इतक्या मोठ्या प्रमाणात विंटेज गाड्यांचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनुराग एक नवा रेकॉर्डचं करत आहे असं म्हणायला हवं. श्रीलंकेत सर्वाधिक विंटेज गाड्या उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटात निर्माता-दिगदर्शक करण जोहर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि फॅन्टम फिल्म्सची निर्मिती असलेला ‘बॉम्बे वेल्वेट’ २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2014 9:24 am

Web Title: 200 vintage cars sourced from sri lanka for ranbir kapoors bombay velvet
Next Stories
1 ‘गँग्स ऑफ वासेपुर’ची अमेरिकावारी
2 चेन्नईच्या संस्कृतीवर ए. आर. रहमानची बहिण करणार गाण्याची निर्मिती
3 ‘सिंघम रिटर्न्स’साठी अजयला ‘किंग खान’कडून शुभेच्छा
Just Now!
X