‘इश्क’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज तब्बल २२ वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र, आजही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावरुन ओसरलेली नाही. या चित्रपटात अजय देवगण, आमिर खान, काजोल आणि जुही चावला या कलाकारांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

‘इश्क’ या चित्रपटाच्या २२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजय देवगण याने एक ट्विट केले होते. यावर त्याची पत्नी काजोल हिने गंमतीशीर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. “नींद चुराई मेरी किसने ओ सनम? तुने..” असे ट्विट अजय देवगण याने केले होते. हे ‘इश्क’ चित्रपटातील प्रचंड लोकप्रिय झालेले गाणे आहे. यावर काजोलने “तुम्हारी नींद चुरा के देखो में कितने चैन से सोई हूं” असे म्हणत प्रतिक्रिया दिली.

यानंतर अभिनेत्री जुही चावला हिने देखील इन्स्टाग्रामवर ‘इश्क’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.