20 November 2019

News Flash

दीपिकासोबत ’83’च्या सेटवर धमाल करतेय ही लहान मुलगी

हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

दीपिका पदुकोण

रणवीर सिंगने आगामी ’83’ चित्रपटातील त्याचा लूक शेअर केल्यापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटामध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

या चित्रपटाच्या सेटवर सगळ्याच कलाकारांची धमाल सुरु आहे पण, दिग्दर्शक कबीर खान यांची मुलगी सायरा कबीर सगळ्यात जास्त मज्जा करतेय. कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून दीपिकासोबत सायराचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघीही खूप आनंदी दिसत आहेत. ’83च्या सेटवर सायरा सगळ्यात जास्त मज्जा करतेय.’ असंही तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

६ जुलैला रणवीर सिंगने वाढदिवसानिमित्त ’83’मधील फर्स्ट लूक शेअर केला होता. या फोटोमध्ये रणवीर हुबेहुब कपिल देव यांच्या सारखा दिसत आहे.२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. सध्या ’83’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, ’83’सोबतच दीपिका मेघना गुलजार यांच्या छपाक या चित्रपटामध्येही झळकणार आहे. छपाक हा चित्रपट दिल्लीतील अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on July 12, 2019 12:04 pm

Web Title: 83 ranveer singh kapil dev cricket deepika padukone djj 97
Just Now!
X