करोना विषाणूचा धोका लक्षात घेत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. लॉकडाऊनपासून जेव्हा कोणी एखाद्या व्यक्तीला कॉल करतो त्याआधी करोनापासून कशी खबरदारी घ्यावी याबद्दल जनजागृती करणारा कॉलर ट्यून सुरू करण्यात आला होता. त्यात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात एक कॉलर ट्यून ऐकायला मिळते. आता दिल्ली उच्च न्यायालयात बिग बींच्या आवाजातली कॉलर ट्यून बंद करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोविड १९ जागरूकतेची कॉलर ट्यून काढून टाकण्याची मागणी करत दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज तकने दिलेल्या माहितीनुसार याचिकेत म्हटले आहे की, “अमिताभ बच्चन या कामासाठी भारत सरकारकडून पैसे घेत आहेत. तर देशात असे अनेक करोना वॉरियर्स आहेत ज्यांनी करोना काळात सामान्य लोकांना अनेक प्रकारे मदत केली. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी या कॉलर ट्यूनमध्ये त्याच लोकांना घ्यायला पाहिजे ज्यांनी समाजाची मदत केली.”
अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच ते ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय अमिताभ ‘चेहरे’ आणि ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 7:46 pm