ए. आर. रेहमानच्या लॉस एन्जेलीस येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. रेहमानने सोमवारी स्वत:च ट्विट करून ही माहिती दिली.
रेहमानने आपल्या बंगल्याच्या छायाचित्रासह ट्विट करताना म्हटले की, लॉस एंजिलीसमध्ये माझ्या घराची तोडफोड झाली आहे. छायाचित्रात त्याच्या घराच्या भिंतीवर काळ्या शाईने काही लिहिलेलेही दिसून येत आहे. त्याचे ट्विट पाहताच २00९साली `स्लमडॉग मिलेनियर` या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार पटकावणा-या रेहमानला सोशल मिडियावर अनेक चाहत्यांनी संदेश पाठविले.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2014 रोजी प्रकाशित
ए.आर.रेहमानच्या घरावर हल्ला
ए. आर. रेहमानच्या लॉस एन्जेलीस येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

First published on: 20-05-2014 at 11:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A r rahmans place in los angeles vandalised