01 March 2021

News Flash

…म्हणून ‘आई कुठे काय करते’च्या कलाकारांनी दिलं ‘त्या’ संस्थेला एक दिवसाचं मानधन

खास कारणामुळे संपूर्ण टीमने केला स्तुत्य उपक्रम

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. अलिकडेच या मालिकेने २५० भागांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण टीमने हटके पद्धतीने या खास दिवसाचं सेलिब्रेशन केलं. इतकंच नाही तर सगळ्या टीमने त्यांच्या एक दिवसाचं मानधनदेखील एका संस्थेला भेट म्हणून दिलं आहे.

मालिकेने २५० भागांचा टप्पा गाठल्यामुळे या संपूर्ण टीमने पुण्याजवळील ‘आपलं घर’ या संस्थेला भेट दिली.विशेष म्हणजे त्यांनी केवळ भेटच दिली नाही. तर त्यांचं एक दिवसाचं मानधनदेखील या संस्थेला दिलं आहे. ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुले आणि वृद्धांची काळजी घेत आहेत.

‘आपलं घर ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुलं आणि वृद्धांचं संगोपन करत आहे. अनेक कलाकारदेखील या संस्थेशी जोडले गेले आहेत. याबद्दल मला माहित होत. त्यामुळेच ‘आई कुठे काय करते’च्या २५० भागांचं सेलिब्रेशन आम्ही आपलं घर मधील या खास परिवारासोबत करायचं ठरवलं. आमच्या संपूर्ण टीमने अख्खा दिवस या परिवारासोबत घालवला. केक कटिंग आणि धमाल करत आम्ही हा दिवस संस्मरणीय केला. या कल्पनेला सर्वांनीच होकार दिल्यामुळे हे शक्य झालं,’ असं दिग्दर्शक रवींद्र करमरकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 6:15 pm

Web Title: aai kuthe kay karte marathi serial 250 episode complete ssj 93
Next Stories
1 सई आणि नचिकेत अडकणार विवाह बंधनात
2 ‘पठाण’च्या सेटवर खरीखुरी फायटिंग; असिस्टंट डायरेक्टरने लगावली सिद्धार्थच्या कानशिलात
3 रियाने फोटोग्राफर समोर जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X