27 February 2021

News Flash

Video : अंबानींच्या सुनेसोबत संगीत कार्यक्रमात आमिर खानने धरला ठेका

या सोहळ्याला बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाचे प्री-व्हेडिंग स्विर्त्झलँड येथे सुरू आहे. अंबानी परिवाराकडून जोरदार या सोहळ्याची तयारी केलेली पाहायला मिळाली. या सोहळ्याला बॉलिवूडसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. करण जोहर, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासह अन्य बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. या संगीत सोहळ्यात बॉलिवूड कलाकार ठेका धरताना दिसून आले. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि श्लोका मेहता डान्स करताना दिसून येत आहेत. आमिर खानने ‘आती क्या खंडाला’ या गाण्यावर श्लोका मेहतासोबत ठेका धरला आहे. यावेळी उपस्थितांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

#shlokamehta with #aamirkhan at #akashambani #shlokamehta fairytale pre wedding bash  @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अंबानी परिवाराने १० मार्च रोजी मंगल पर्वाचे आणि ११ मार्च रोजी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक दिग्गज हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची ग्रँड वेडिंग सेरेमनी मुंबईतील वर्ल्ड सेंटरमध्ये ठेवण्यात आली होती.

 

 

View this post on Instagram

 

#mukeshambani with #shlokamehta at #akashambani #shlokamehta fairytale pre wedding bash @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 12:02 pm

Web Title: aamir khan dancing with bride to be shloka mehta on aati kya khanadala
Next Stories
1 शाहरुखचा ‘जबरा फॅन’! १५० विनंतीचे मेसेज पाठवणाऱ्या चाहत्याची ‘मन्नत’ होणार का पूर्ण ?
2 विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुखरूप वापसीसाठी बॉलिवूडची प्रार्थना
3 चित्रपट प्रदर्शित होऊन महिने उलटले तरीही मानधन नाही, ‘पलटन’च्या कलाकार, क्रू मेंबरचा आरोप
Just Now!
X